बातमी मागची बातमी

लॉकडाऊन लांबल्यामुळे अरुण गवळीला पुन्हा पॅरोलवाढ 

साम टीव्ही न्यूज

नागपूर :  लॉकडाऊनच्या काळात गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता मराठी कलाकार अक्षय वाघमारेच्या विवाहबंधनात अडकली. शुक्रवारी दगडी चाळीत मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. २९ मार्च रोजी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा विवाह होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे ही तारीख पुढे ढकलत ८ मे चा मुहूर्त काढण्यात आला. मुळचा पुण्याचा असल्याने अक्षयने लग्नासाठी पोलिसांची परवानगी घेत मुंबई गाठली.


पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला २७ एप्रिल रोजी कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, लॉकडाउनमुळे उच्च न्यायालयाने त्याला पहिल्यांदा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर लॉकडाउन लांबले. 
लॉकडाउन लांबल्यामुळे मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलमध्ये २४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी शुक्रवारी गवळीची यासंदर्भातील याचिका मंजूर केली.  परिणामी, न्यायालयाने गवळीच्या पॅरोलमध्ये दुसऱ्यांदा वाढ केली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

WebTittle ::  Arun Gawli's parole extended again due to prolonged lockdown


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai Net Worth: अभिनेत्री ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती आहे

Maharashtra Live News Update: चंद्रपुरातील इथेनॉल कंपनीत स्फोट

बिबट्यांचा धुमाकूळ; घराच्या अंगणात एक, दोन नव्हे तर तीन बिबटे|VIDEO

Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT